कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कुुटंबियांनी त्यांचा मृतदेह नाकारला तेव्हा प्रशासनानेच त्यांच्याव अंत्यसंस्कार केले. मध्य प्रदेशात कोरोनाच्या भीतीमुळे लेकानेच बापाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. शुजालपूर इथल्या प्रेम सिंग मेवाडा यांना कोरोना झाला होता. त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. प्रेम सिंग यांचा मुलगा संदीप मेवाडा आणि पत्नीसह इतर नातेवाईक दवाखान्यात आले होते. पण त्यांनी मृतदेह नेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. शेवटी कोणीच पुढे न आल्यानं दोन दिवस मृतदेह खराब व्हायला लागला. तेव्हा तहसिलदारांनी स्वत: मुलाचं कर्तव्य निभावलं. तहसिलदारांनी आणखी दोघांना मदतीला घेत प्रेम सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले.