भिंवडी आणि शिर्डीमध्ये वाहनांना रस्त्यावरच आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
2/ 6
रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग इतकी वाढली की संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली.
3/ 6
पुणे - नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती इथे ही दुर्घटना घडली आहे.
4/ 6
आग लागताच बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
5/ 6
भिंवडीमध्ये वंजारपट्टी नाका इथे टॅक्सी (ओमनी व्हॅनला) आग लागली आहे. अचानक आग लागली असल्यानं मोठा गोंधळ उडाला. मात्र तत्काळ नागरिकांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
6/ 6
दोन्ही दुर्घटनांमध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झालं आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.