

तुम्ही कधी अंदमान-निकोबार बेटांवर फिरण्यासाठी गेला आहात का? जर गेला असाल तर अंदमानचं हे सगळ्यात सुंदर बेट तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल. होय, अमेरिकन नागरिकाने या भागात घुसखोरी केल्यामुळे बेटांवरील आदिवासी लोकांची त्याची हत्या केली आहे.


या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. हे हत्यारे सेंटिनेलिस जनजातीय समुदायाची असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या बेटाबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या वाचल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल.


जॉन ऐलन चाऊ असं अमेरिकी नागरिकाचं नाव आहे. त्याने या सेंटिनल बेट भागात घुसखोरी केली होती. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे. जॉन यांचं शव हे उत्तर सेंटिनल बेटावरून स्थानिक मच्छीमारांनी ताब्यात घेतलं आहे.


सेंटिनल बेट असं या बेटाचं नाव आहे. ही भारतातली अशी जागा आहे जिथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही आहे. तिथे कोणताही सरकारी अधिकारी, उद्योगपती, भारतीय सैन्य किेंवा इतर कोणालाही या भागात जाण्याची परवानगी नाही आहे.


खरंतर हे बेट म्हणजे किंग कॉन्ग सिनेमातल्या स्कल बेटासारखं आहे. जिथे एकदा गेलेला माणूस कधीही परतत नाही.


तसं पाहिला गेलं तर हे बेट एका सर्वसाधारण बेटासारखंच आहे. सगळ्यात शांत आणि सुंदर. पण यात वेगळं म्हणजे या बेटावर तुम्हाला एकही पर्यटक दिसणार नाही. (photo credit - LoveBite Productions)


प्रशांत महासागराच्या उत्तर सेंटिनल बेटावर असा समाज राहतो जिथे कसलीही आधुनिकता नाही. या बेटावर राहणारे आदिवासी कोणाशीही संपर्क ठेवत नाही आणि कोणाला संपर्कात येऊही देत नाहीत. आणि कोणी त्यांच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न केलाच तर ते थेट त्यांची हत्या करतात.


2006ला काही माच्छीमार चुकून या बेटावर पोहचले होते. आपण कुठे पोहचलो आहे हे समजण्याच्या आतच त्यांची हत्या करण्यात आली. या बेटावर राहणारे लोक बाण चालवण्यात तरबेज आहेत.


अहो, हे सगळं सोडा...त्यांच्या भागावरून साधं विमान जरी गेलं तरी ते विमानावर हल्ला करतात. त्यामुळे इथे कोणाचीही जाण्याची हिम्मत नाही आहे.


60,000 वर्षांपासून इथे हे लोक अस्तिवात असल्याचं सांगण्यात येत आहे. काही रिपोर्टनुसार इथे डजनभर लोक राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काहींना वाटतं की इथे फक्त 100-200 लोक राहतात.


या आदिवास्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आवडत नाही. आणि कोणी केला तर त्याची ते लोक हत्या करतात. त्यामुळे या सुंदर अशा बेटावर जाण्याची कोणाचीही हिंमत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती पुढील स्लाईडमध्ये...