

जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट आहे. तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, १ डिसेंबरपासून तुमची इंटरनेट बँकिंग सेवा बंद होऊ शकते. एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइट onlinesbi.com वर याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.


यानुसार, जर तुम्ही एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगची सेवा वापरत असाल, पण तुम्ही अजूनही तुमचा नंबर बँकेत रजिस्टर केला नसेल तर लवकर करा.


बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरपासून कोणताही ग्राहक इंटरनेट बँकिंगमार्फत पैशांची लेन- देन करू शकत नाही. म्हणजे तुमची ऑनलाइन बँकिंग अकाऊंट बंद होणार. आरबीआयने घोषित केलेल्या नियमांनंतर एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.


असं करा अपडेट- एसबीआयने म्हटले की, तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावं लागेल. तिथे जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. तरंच तुमची सुविधा पुढेही सुरू राहिल.