

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रियालन्स जीओ Reliance Jio आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक प्लान ऑफर करत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना अधिक डेटा, फ्री आयपीएलसारखे IPL फायदे मिळतात. रियालन्स जीओने कमी किंमतीत असे काही प्लान लॉन्च केले आहेत, ज्यात ग्राहकांना दररोज 3GB डेटाचा फायदा दिला जातो.


एवढंच नाही तर यासह कंपनीने ग्राहकांना 6GB एक्सट्रा देण्याचीही घोषणा केली आहे. Jioचा हा प्लान 401 रुपयांचा Cricket प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते.


या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा + 6 जीबी एक्सट्रा डेटा देण्यात येत आहे. म्हणजेच एकूण 90 जीबी डेटा देण्यात येत आहे.


या प्लानची खास बाब म्हणजे यात, ग्राहकांना 1 वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये देण्यात येत आहे.


कॉलिंगसाठी या प्लालमध्ये जीओ टू जीओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 नॉन-जिओ मिनिट्स मिळतात. त्याशिवाय दररोज 100 SMS या प्लानमध्ये देण्यात आले आहेत.