Rafale fighter jets: आता पंगा नाही घ्यायचा! भारताची ताकद असलेलं Rafale हवाई दलात दाखल, पाहा PHOTOS
आतापर्यंत 10 राफेल विमाने भारताला पुरवण्यात आली असून त्यापैकी पाच सध्या फ्रान्समध्ये आहेत.
|
1/ 8
लडाखमधील भारत-चीनच्या सीमावादावरून लडाखमध्ये LACवर मोठ्या प्रमाणात तणाव वाढताना दिसत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज औपचारिक पद्धतीनं राफेल भारतीय हवाईदलात दाखल होत आहेत.
2/ 8
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्सचे समकक्ष फ्लॉरेन्स पार्ले, सैन्यदलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया आणि संरक्षण सचिव अजय कुमार उपस्थित या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.
3/ 8
राफेल आणि तेजस लढाऊ विमानं आज हवाई प्रात्यक्षिकं करणार आहेत. कुरापती करणाऱ्या चीन आणि पाकिस्तानसाठी हा सूचक इशाराही असणार आहे.
4/ 8
भारताची शान आणि ताकद वाढवणाऱ्या राफेल लढाऊ विमानाला पारंपरिक पद्धतीनं सलामी दिली जाईल. त्यानंतर पूजा करून हवाईदलात दाखल होणार आहे.
5/ 8
29 जुलै रोजी राफेलचा पहिला 5 विमानांचा ताफा भारतात दाखल झाला. 3 लढाऊ आणि 2 प्रशिक्षित विमानं यामध्ये आहेत. एकूण 38 विमानं टप्प्या टप्प्यानं भारताच्या हवाई ताफ्यात दाखल होणार आहेत.
6/ 8
"राफेल विमानास सकाळी 10 वाजता अंबालाच्या हवाई दलाच्या स्टेशनवर भारतीय हवाई दलात औपचारिकपणे प्रवेश होईल." हे विमान 17 स्क्वॉड्रॉन, "गोल्डन एरो" चा भाग असेल. अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून दिली आहे.
7/ 8
आतापर्यंत 10 राफेल विमाने भारताला पुरवण्यात आली असून त्यापैकी पाच सध्या फ्रान्समध्ये आहेत. भारतीय हवाई दलाचे वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत 2021 च्या अखेरीस सर्व 36 लढाऊ विमानं भारताच्या हवाई दलात सामाविष्ट होतील असं सांगितलं जात आहे.
8/ 8
रशियाकडून सुखोई विमान खरेदी केल्यानंतर हवेत आणि अचूक क्षमतेनं मारा करणारं दुसरं विमान म्हणजे फ्रान्सकडून येणारं राफेल विमान. राफेल विमान हे अचूक निशाणा साधून मारा करणारं आणि शस्र आणि प्रगत प्रणालीनं सुसज्ज आहे.