

मुंबईसह देशभरात उकाडा वाढला आहे. त्यात प्रत्येकजण हलके आणि रंगीबेरंगी कपडे घालायला प्राधान्य देत आहेत. तुम्हीही प्रियांकाचा हा ड्रेस पाहून असाच ड्रेस घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा.


कारण तिच्या या ड्रेसची किंमत एकदा पडताळून पाहा आणि मगच हा ड्रेस घ्यायचा की नाही याचा निर्णय घ्या. हा ड्रेस एवढा महाग आहे की, त्यात तुमची एक थायलँडची ट्रीप नक्कीच होऊ शकते.


नुकतीच प्रियांका तिच्या छोट्या भावाच्या सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी मुंबईत आली. यावेळी तिचा एअरपोर्ट लुक दिसला. देसी गर्लने यावेळी पिवळ्या रंगाचा टॉप आणि पॅन्ट घातली होती. तिचा हाच लुक सोशल मीडियावर कमालिचा व्हायरल झाला होता.


आता प्रियांकाच्या या लुकची किंमतीबद्दल बोलायचे झाले तर प्रियांकाचा हा पूर्ण ड्रेस ५४ हजारांचा आहे. प्रियांकाने Tibi चा जो क्रिस्पी विस्कोस पोलो मेश पुलओवर घातलं आहे.


याची किंमत ३५० डॉलर आहेत. भारतीय रुपयांमध्ये बोलायचे झाले तर या ड्रेसची किंमत जवळपास २४,४४२ रुपये आहे. तर तिची पॅन्ट ४५० डॉलरची आहे. म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे ३१, ४२६ रुपये आहे.


आता एवढे महाग कपडे घालण्यापेक्षा एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरून यायला तुम्ही नक्कीच प्राधान्य द्याल ना? अगदीच तुम्हाला फिरण्याची इच्छा नसली तरी तुम्ही एका ड्रेससाठी एवढे रुपये खर्च करणार का?