Home » photogallery » news » PRIME MINISTER NARENDRA MODI ENTERS THE 20TH YEAR AS THE HEAD OF A DEMOCRATICALLY ELECTED GOVERNMENT
नरेंद्र मोदींचा अभूतपूर्व विक्रम : सलग दोन दशकं सत्तेचा दोर आहे हाती!
नरेंद्र मोदी यांनी राज्यकारभार हाती घेतल्याला आज 20 वर्षं झाली. पंतप्रधानपदापूर्वी त्यांनी सलग तीन वेळा गुजरात निवडणूक जिंकून मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.
|
1/ 9
नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्तेची दोरी आली त्याला बरोबर दोन दशकं झाली.
2/ 9
2002 सालची गुजरात निवडणूक जिंकून ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. त्यानंतर मोदींच्या हातून सत्तेची दोरी कधीच सुटलेली नाही.
3/ 9
2002, 2007 आणि 2012च्या गुजरात विधानसभा निवडणुका त्यांनी सलगपणे जिंकल्या आणि मुख्यमंत्री झाले.
4/ 9
सप्टेंबर 2013 मध्ये नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आणि गुजरातमधून त्यांचं लक्ष दिल्लीकडे वळलं.
5/ 9
2014 मधली लोकसभा निवडणूक भाजपने किंबहुना NDA ने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं मोठं यश मिळवलं .
6/ 9
26 मे 2014 रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
7/ 9
2019 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली आणि अभूतपूर्व यश मिळवलं.
8/ 9
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत इतिहास घडवत भाजपच्या नेतृत्वाखाली NDA ला 300चा आकडा पार करता आला.
9/ 9
30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले.