

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कोरोनामुळे आपल्या आयुष्यात जसे वेगवेगळे बदल झाले तसाच ट्रॅक सध्या तारक मेहतामध्ये दाखवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पत्रकार पोपटलालची नोकरी गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. तरीही पोपटलाल (Popatlal) हिंमत हरला नाही. पोपटलाल आता चक्क भाजी विकताना दिसणार आहे. भाजीची गाडी घेऊन शहरामध्ये भटकताना दिसणार आहे.


पोपटलालची नोकरी गेली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला होता. अनेक दिवस तो चिंतेत होता असं दाखवण्यात आलं होतं. पण आता त्याने सगळी हिंमत गोळा करुन पुन्हा एक नवा व्यवसाय सुरू केला आहे.


पोपटलालचं ब्रह्मचारी असणं, त्याला कोणतीही मुलगी पसंत न पडणं यामुळे मालिकेत बरीच रंगत आली होती. आताही पोपटलालने आपल्या भाजीच्या गाडीचं नाव ‘कुंवारा पोपटलाल सब्जीवाला’ असं दिलं आहे.


पोपटलाल अगदी गोकुळधाम सोसायटीमध्येही भाजी विकताना दिसत आहे. गोकुळधाममधील महिला मंडळानेही पोपटलाल मदत करण्यासाठी त्याच्याकडून भाजी खरेदी केली आहे.


भाजी विकण्याच्या आधी बेरोजगार झालेल्या पोपटलालने अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. त्याने गोकुळधाम सोसायटीमधील लोकांची मदतही मागितली होती. गोकुळधाममधील लोकंही त्याच्या पाठिशी उभी राहिली.


पोपटलालची मदत करण्यासाठी रोशन सिंह सोढीने त्याला मॅकेनिकचं काम शिकवलं. पण तो प्लानही पोपटलालने ‘कॅन्सल’ केला.