

भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. काल सामना सुरू असतानाच पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.


धोनी आणि विराट यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना पृथ्वी शॉने रणवीर सिंगच्या गल्ली बॉय सिनेमातील डायलॉग 'ये भाई लोग जैसा कोई हार्ड इच नही है' असा कॅप्शन दिला आहे.


पृथ्वी शॉने शेअर केलेल्या फोटोवर एका युजरने कमेंट करताना म्हटलं आहे की, क्रिकेटचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकाच फोटोत आहेत.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी वर्ल्डकप 2019 साठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या लॉन्चिंग सोहळ्याला उपस्थित होता.