मराठीतील एक क्युट फेस असणारी अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे पर्णच्या नव्या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे यामध्ये ती एकदम sizzling लुकमध्ये दिसत आहे. ओव्हरसाईझ कोट सारखा एक फिकट रंगाचा स्ट्राईप्स असणारा वन पीस आणि मिनमल ज्वेलरी तिने परिधान केली आहे. फक्त हातात अंगठ्या घालत बाकीची काहीच ज्वेलरी न घालता मेकअपवर तिने अधिक भर दिला आहे. एरवी साधी,निरागस वाटणारी पर्ण या लुकमध्ये एकदम कमाल आणि sizzling दिसत आहे. तिचा 'मिडीयम स्पायसी' नावाचा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्याच्याच मुंबई प्रीमियरला ती या आऊटफिटमध्ये दिसली. चित्रपट जरी मिडीयम स्पायसी असला तरी तिचा लुक मात्र जाळ करणारा तिखट आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.