

डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पैशांची देवाण- घेवाण करण्याची सुविधा पुरवणाऱ्या पेटीएमने विमा कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. आता एलआयसीचे ग्राहक एलआयसीचे हफ्ते अगदी काही सेकंदात भरू शकतात.


पेटाएमने सांगितले की, पेटीएमच्या माध्यमातून ३० हून जास्त विमा कंपन्यांचे प्रिमिअर हफ्ते भरता येऊ शकतात.


या कंपन्यांमध्ये एलआयसी, आयसीआयसीआय प्रेडिंश्युअल लाइफ, रिलायन्स लाइफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, टाटा एआयए, एसबीआय लाइफ, आदित्या बिर्ला सन लाइफ, कॅनरा एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, श्री राम लाइफ आणि स्टार हेल्थसारख्या अन्य कंपन्यांचा यात समावेश आहे.


पेटीएमचे अधिकारी किरण वासी रेड्डीने सांगितले की, आपल्या देशात विमा प्रिमिअरमचे हफ्ते अधिकतर ऑफलाइन पद्धतीनेच दिले जातात. पेटीएमच्या माध्यमातून लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय विमा कंपन्यांचे हफ्ते भरता येतील. यासाठी आम्ही एलआयसी आणि इतर विमा कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे.