

नाना पाटेकर यांच्या आई निर्मला पाटेकर यांनी मंगळवारी २९ जानेवारीला सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या ९९ वर्षांच्या होत्या. मंगळवारीच त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.


यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आईच्या निधनावेळी नाना घरात नव्हते.


त्यांना ही बातमी कळताच ते तातडीने घरी पोहोचले. नाना यांच्या वडीलांच गजानन पाटेकर यांचं नाना २८ वर्षांचे असताना निधन झालं.


त्यानंतरची कितीतरी वर्ष नाना आणि त्यांच्या आई गावी राहत होते. गजानन आणि निर्मला पाटेकर यांना एकूण सात मुलं होती. मात्र पाच मुलांचं लहान असतानाच निधन झालं.


नाना आपल्या आईच्या किती जवळ आहेत हे त्यांनी वेळोवेळी कार्यक्रमातून सांगितलं. फक्त आईला आनंद मिळावा म्हणून त्यांनी घरात गणपती बसवायला सुरुवात केली होती.


नाना आणि त्यांच्या आईंनी दोघांनी मिळून संर्घषाचा काळ एकत्र जगला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.