

सोशल मीडियाचं वेड म्हणा किंवा शाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा. या दोन्ही गोष्टीमुळे विद्यार्थ्यांवर धाक राहिला नाही. नुकताच एका शाळेत असा प्रकार घडला जेव्हा एका विद्यार्थ्याने पदव्युत्तर परीक्षा देताना चक्क फेसबुक लाइव्ह केले. या फेसबुक लाइव्हमध्ये परीक्षागृह स्पष्टपणे दिसत होतं.


प्रत्येकवेळी स्टेटस अपडेट करण्याची आवड असलेल्याची हद्द तेव्हा झाली जेव्हा एका विद्यार्थ्याने परीक्षागृहातून फेसबुक लाइव्ह झाल्यानंतर सेल्फीही अपलोड केला.


बिहारच्या मोतीहारी येथील एमएस कॉलेजमधील ही घटना आहे. एका मुलाने परीक्षा सुरू असतानाच आपल्या फोनमधून फेसबुक लाइव्ह केलं आणि सेल्फी काढली. त्याच्या या फोटोमध्ये पेपर, टेबल आणि इतर विद्यार्थी स्पष्टपणे दिसत आहेत.


जेव्हा कॉलेजच्या प्रशासनाला याबद्दल कळले, तेव्हा एकच हलकल्लोळ माजला. पण तरी प्रशासनाने कारवाई करु असे सांगून विषय झटकला.


अशा प्रकारच्या घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा विद्यार्थ्यांना परीक्ष केंद्रात मोबाईल घेऊन जाताना पकडले गेले आहे.