पहिल्या मुसळधार पावसाताच मुंबई पाण्यात, पाहा प्रत्येक ठिकाणचे PHOTOS
पहिल्या मुसळधार पावसातच मुंबईत झाली दैना, भीषण PHOTO
|
1/ 11
राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढत असताना सुरू झालेल्या मान्सूनमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढणार आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली.
2/ 11
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मुंबईत आणि उपनगरांत पावसाचा जोर सुरू आहे.
3/ 11
अंधेरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे सबवेकडे जाणारा मुख्य मार्गदेखील बंद करण्यात आला आहे.
4/ 11
साचलेल्या पाण्यामध्ये ऑटोरिक्षा आणि इतर वाहनं अडकून पडले असल्याची माहिती देण्यात येत आहे. सबवेच्या रस्त्यामध्ये जिथे जिथे पाणी साचलं तिथे पोलिसांकडून दोर लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.
5/ 11
मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विशेषतः मेट्रोची काम सुरू असलेल्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतं.
6/ 11
चर्चगेट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
7/ 11
सायन भागात षणमुखानंद सभागृह रोडवरील मुख्य रस्ता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या रस्त्यावर झाली आहे.
8/ 11
मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेले सर्वीस रोडच जागोजागी खचल्यामुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वाहतुकीला धोका निर्माण झालाय.
9/ 11
वसई विरारमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचू लागलं आहे.
10/ 11
नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वाशी, बेलापूर, पनवेल भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
11/ 11
नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वाशी, बेलापूर, पनवेल भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.