'एमटीवी रोडीज़ राइजिंग'ची विजेती श्वेता मेहता आजकल तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे खुप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासूव श्वेताचे काही बोल्ड फोटोज इंटरनेटवर कल्ला करतायत. गेल्या काही दिवसांपासून श्वेता खूपच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. श्वेताने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं. श्वेता तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना श्वेता नेहमी तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. मुळची पंजाबची श्वेता मेहताही पेशाने इंजीनिअर आहे. ती बंगळूरूच्या एका आयटी कंपनीत काम करते. श्वेताने 'जेराई वुमेन फिटनेस मॉडल चॅम्पियनशिप 2016'ची विजेती आहे. श्वेताच्या या हॉट फोटोजमुळे तिच्या सोशल मीडियावरच्या चर्चाही वाढल्या आहेत.