कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी धोनी दुबईत, साक्षीने शेयर केले PHOTO
आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK) ची कामगरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफ गाठता आली नाही, त्यामुळे धोनी (MS Dhoni) ला युएईमधून भारतात लवकर परतावं लागलं.
|
1/ 5
भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर युएईमधून भारतात परत आला. यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK) टीमचं आव्हान लवकर संपुष्टात आल्यामुळे धोनीला भारतात लवकर परतावं लागलं. यानंतर आता धोनी सुट्टीवर गेला आहे.
2/ 5
धोनी सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. धोनीची पत्नी साक्षीने विमानातले आणि विमानतळावरचे काही फोटो शेयर केले आहेत.
3/ 5
साक्षीने या फोटोंमध्ये कुठेही ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही, पण हे फोटो बघून ते दुबईमध्ये गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.
4/ 5
साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या सुट्टीचे काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती आणि धोनी मित्रांसोबत जेवताना आणि मस्ती करताना दिसत आहेत.
5/ 5
धोनीचे पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबतचे पिकनिकचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.