

काही महिन्यांपूर्वी तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं अमृतावर्षीनी या मुलीच्या वडिलांनी तिच्या डोळ्यांदेखत नवऱ्याला प्रणयला ठार मारलं होतं. जातीबाहेर लग्न केल्याच्या रागामुळेच अमृताच्या वडिलांनी ऑनर किलिंगचा अक्षम्य गुन्हा केला होता.


आज अमृताने प्रणयच्या मुलाला जन्म दिला. प्रणयच्या मृत्यूवेळी अमृती पाच महिन्यांची गरोदर होती. बुधवारी अमृताला प्रसुती कळा जाणवू लागल्यामुळे तिला मिर्यालगुडा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. आई आणि मुलगा सुखरुप आहेत.


मुलाला पाहून प्रणयचीच आठवण येते आणि आपसूक डोळे पाणवले जातात अशी प्रतिक्रिया अमृताने दिली. आपल्या पोटी प्रणयच आला असल्याचं अमृताचं स्पष्ट मत आहे. अमृताचे वडील मारुती राव ऑनर किलिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत.


सिनेमात जसं दिसतं ते प्रत्यक्षात असावं असं काही नाही, पण सिनेमा हा समाजाला आरसा दाखवतो एवढं मात्र खरं आहे. सैराट सिनेमात घरदार सोडून आपल्या प्रेमाचं स्वप्न पाहणाऱ्या आर्ची आणि परश्याचा अंत मन धस्स करून जाणारा...बरं हे काही पहिल्यांदाच घडलं असं नाही समाजात अशा अनेक घटना आहे ज्या खोट्या प्रतिष्ठेसाठी अशा कित्येक आर्ची आणि परश्याचा जीवावर उठल्यात. तेलंगाणामध्ये अमृता आणि प्रणय यांची कहाणीही अशीच आहे....त्यांचीही चूक एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...


मिरयालगुडा येथील मारुतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मित्र प्रणयने आठ महिन्यांपूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलांकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही.


घरदार सोडून दोघंही तेलंगणाच्या मिर्यालगुडा भागात गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही लवकरच येणार होता. नव्या पाहुण्याचे स्वप्न पाहुन दोघेही आनंदी होती.


आज सकाळी पाच महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नी अमृताला घेऊन स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात होता.


दोघे जण जात असताना प्रणयवर अज्ञात इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केल्या. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला.


हल्ला करणारा हल्लेखोर तेथून पळून गेला. स्थानिकांनी धावाधाव करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.