

दिग्गज बास्केटबॉलपटू आणि एनबीए स्टार मायकल जॉर्डन जगातील सर्वात श्रीमंत खेळांडूंपैकी एक आहे. जॉर्डन जवळपास 110 अब्ज संपत्तीचा मालक आहे.


शिकागोत त्याचं अलिशान घर असून त्याची किंमत दोन अब्ज इतकी आहे. 56 हजार स्क्वेअरफूट परिसरात असलेल्या या घराला अर्ध्या किंमतीत विकण्याचाही प्रयत्न केला मात्र तरीही कोणी विकत घेण्यास पुढे आलं नाही.


अलिशान घर उभारताना जॉर्डनने त्याच्या लाइफ स्टाइलला साजेसं असंच ते केलं आहे. यामध्ये 9 मोठ्या बेडरूम, 19 बाथरूम आहेत. याशिवाय पियानो रूमसुद्धा आहे.


जॉर्डनच्या घरी बास्केटबॉलचं फुल साइज मैदान आहे. याशिवाय अद्ययावत अशी यंत्रे असलेली जिमसुद्धा या घरामध्ये आहे.


फक्त बास्केटबॉलच नाही तर इतर खेळांची मैदानेही या घराच्या परिसरात आहेत. यात टेनिस कोट्र, गोल्फ आणि इनडोअर गेम्ससाठी सुद्धा खास जागा आहे. आयलँडच्या धर्तीवर एक स्वीमिंगपूलही घरामध्ये आहे.