गेल्या सात वर्षांपासून मारुती सुझुकी या कारवर काम करत आहे. पण, नेमकी गाडी कधी लाँच करणार याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण आता...
|
1/ 8
मारुती सुझुकीची लोकप्रिय वॅगन-आर (Maruti Suzuki WagonR) आता नवीन अवतारात पाहण्यास मिळणार आहे. आतापर्यंत ही गाडी चार सीटर होती. आता ही कार सात सीटर लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे.
2/ 8
मारुती सुझुकीची WagonR चे नवीन रुप हे MPV अर्थात मल्टी पर्पज व्हेइकल असणार आहे. ही नवीन MPV WagonR ची सध्या कंपनीकडून ड्राइव्हिंग टेस्ट सुरू आहे.
3/ 8
मारुतीने या MPV WagonR मध्ये एक्सटेंडेड व्हील व्हर्जनचा वापर केला आहे. 7-सीटर WagonR पेक्षा जास्त रूंद आणि लांबीची असणार आहे. साधारण: WagonR पेक्षा या MPV WagonR ची लांबी ही जास्त असणार आहे.
4/ 8
MPV WagonR ही पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये लाँच होणार आहे. MPV WagonR डिझेल व्हर्जनमध्ये 0.8-लिटर ट्विन-सिलेंडर DDiS 125 इंजिन दिले जाणार आहे. हेच इंजिन सेलेरियो (Celerio) मध्ये लावलेले आहे.
5/ 8
पेट्रोल व्हर्जनमध्ये स्विफ्ट हॅचबॅकचे इंजिन वापरलेले जाण्याची शक्यता आहे. यात 1.2 लिटर क्षमतेचे 4 सिलेंडर इंजिन वापरले जाणार आहे. त्यामुळे हे इंजिन 82 Bhp पॉवर आणि 113 Nm चा टार्क जेनरेट करेल.
6/ 8
त्याशिवाय कारमध्ये अनेक बदल केले आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गियरबॉक्स देण्यात येणार आहे. भविष्यात या कारला हायब्रिड आणि ईवी पावरट्रेन सह लाँच करण्याची शक्यता आहे.
7/ 8
गेल्या सात वर्षांपासून मारुती सुझुकी या कारवर काम करत आहे. पण, नेमकी गाडी कधी लाँच करणार याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. नव्या WagonR मध्ये ग्रिल, फ्रंट आणि रियर बंपर पाहण्यास मिळत आहे. तसंच हेडलॅम्प आणि टेललॅम्पमध्येही बदल करण्यात आले आहे.
8/ 8
मारुती सुझुकीची आधीच एर्टिगा बाजारात आहे. त्यामुळे या गाडीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होऊ नये, असं कंपनीला वाटत आहे. त्यामुळे या नव्या WagonR ही MPV असेलच पण, त्याखालील इतर मॉडेलची जागा घेणार आहे.