संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. संस्कृती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. संस्कृतीने नुकतेच लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. संस्कृतीच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत. विविध पोझ देत संस्कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे. संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. . तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संस्कृतीने मध्यंतरी देखील गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले होते. तिचा गुलाबी अंदाज देखील चाहत्यांना चांगलाच आवडला होता.