

मलायका बॉलिवूडमधील मादक अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतःच्या लूकवर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक लक्ष देते.


बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांनी अजुनपर्यंत त्यांच्या नात्याला अधिकृतरित्या कबूली दिली नाही. मात्र अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात येतं.


असे असतानाही अनेकदा ती तिच्या लूकमुळेच जास्त ट्रोल होते. ती सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. मलायकाने नुकताच तिचा एक मादक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र या फोटोवरही तिला ट्रोल करण्यात आलं.


लॅक्मे फॅशन वीकसाठी मलायकाने मनोज अग्रवालने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. हा फोटो युझर्सना फारसा आवडला नाही.


एका युझरने लिहिलं की, ‘मछली जल की रानी है... जीवन उसका पानी है...’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘तुम्ही दिवसें दिवस म्हाताऱ्या दिसत आहात. अशा पद्धतीचे कपडे घालू नका.’


अजून एका युझरने लिहिले की, ‘वय होत चाललं आहे. सत्संगला जात जा...’ मलायकाच्या या फोटोवर तिला अनेक प्रकारच्या कमेंट मिळत आहेत.