

लिव्हर ज्याला मराठीत यकृत असं म्हणतात ते केवळ रक्ताच शुद्ध करत नाही, तर हार्मोन्स तयार करण्याचं, उर्जा स्टोअर करण्याचं आणि अन्न पचनाचं काम करतं. जर तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर आधी तुमचं लिव्हर तुम्हाला निरोगी ठेवावं लागेल. आठवडाभरात लिव्हर तंदुरुस्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला कीही घरगुती उपाय सांगणार आहोत.


19 एप्रिल हा दिवस दरवर्षी World Liver Day म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लिव्हर सशक्त आणि तंदुरुस्त कसं राहील याची आपण काळजी घ्यायला हवी.


लिव्हर हे पचनसंस्थेचा महत्त्वपूर्ण आंग मानलं जातं. शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याच काम लिव्हर करतं. लिव्हर खराब झालं तर कावीळ हा जीवघेणा आजार होतो. तर अती मद्य सेवनाने कन्सरसुद्धा होऊ शकतो.


फिटनेस एक्सपर्ट्स सांगतात की काही प्रकारचे ज्यूस लिव्हरसाठी अत्यंत लाभदायक असून, ते शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास सहाय्यक ठरतात.


लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही दुधी भोपळा, हळदी, धने, गुळवेल असं एकत्र करून त्यात काळं मीठ टाकून हे प्येय घेतल्यास शरिरातील विषारी पदार्थ निघून जातात.


गाजर आणि आवळ्याचा अर्क एकत्र करून त्यात सेंधें मीठ टाकावं. याचं नियमित सेवन केल्यास लिव्हरला आलेली सूज आठवडाभरात कमी होते.