

सोनीपत जिल्ह्यातील गोहाना लाईटमध्ये रस्ते अपघातात तीन जण जळाल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली व वॅगनआर कारची धडक झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की काही क्षणात कारनं पेट घेतला. यात आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला. (फोटो: न्यूज 18)


आग लागण्याचे कारण वॅगनआरमधील सीएनजी किट सांगितले जात आहे. ट्रॅक्टरशी टक्कर झाल्यानंतर कारला आग लागली आणि कारचे सेंटर लॉक बंद झाले, यात कार चालक व इतर दोन चालक गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. (फोटो: न्यूज 18)


या कारमध्ये आग लागल्याची माहिती एका ग्रामस्थानं अग्निशमन दलाला व पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले व त्यांनी गाडीला लागलेली आग विझविली. तोपर्यंत तिघांचे मृतदेह जळून खाक झाले. (फोटो: न्यूज 18)


अग्निशमन कर्मचाऱ्याने सांगितले की आम्हाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला की खानपूर-काकाना रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली व वॅगनआरची टक्कर झाली असून त्यामुळे आग लागली आहे. या माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठले आणि पोलीसही तेथे उपस्थित होते. (फोटो: न्यूज 18)