

एका भारतीय मुलीने एका पाकिस्तानी मुलीशी समलैंगिक विवाह केला आहे. सध्या जगभर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.


बियांका (Bianca)आणि सायमा(Saima) असं दोघींचं नाव आहे. दोघींनीही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी लग्न केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.


बियांका आणि सायनाच्या या समलैंगिक लग्न सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीयही हजर झाल्याचं पाहायला मिळालं.


याआधी मूळची पाकिस्तानी मुस्लीम कलाकार सुंदस मलिक आणि भारतीय हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


या दोघी गेलं वर्षभर रिलेशनशिपमध्ये आहेत, हे त्यांनीच शेअर केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनवरून उलगडतं. (फोटो - इन्स्टाग्राम)


अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू तर सुंदर मलिक पाकिस्तानी मुस्लीम. त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत आणि चर्चेचा विषय बनले आहेत.


त्यांच्या प्रेमामध्ये धर्माच्या मर्यादाही आल्या नाहीत आणि देशाच्याही. एवढंच काय प्रेम देश, प्रदेश, धर्म, जात आणि लिंग यापलीकडे असतं, हे त्यांच्याकडे बघून पटतं.


'अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी' या कॅप्शनने एका छायाचित्रकाराने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि त्याची चर्चा सुरू झाली.


@Sarowarrrr या नावाच्या फोटोग्राफरच्या हँडलवरून ही न्यूयॉर्क लव्ह स्टोरी सोशल मीडियावर दाखल झाली.


सुंदस मलिक ही आर्टिस्ट आहे, असं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून दिसतं तर अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू आहे.


या दोघींच्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सेलिब्रेशनही केलं.