सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत केलेली ती एक चूक निवडणूक अधिकाऱ्यांना भलतीच भारी पडणार असल्याचं दिसतंय. दुसऱ्या सत्रातील लोकसभा निवडणुकीत रजनीकांत मतदान करायला गेले होते.
2/ 7
यावेळी रजनीकांत यांच्या उजव्या हाताऐवजी डाव्या हाताच्या तर्जनीवर शाही लावण्यात आली. आता नेमकी हे प्रकरण चांगलं तापताना दिसत आहे. असं म्हटलं जातंय की, या चुकीमुळे मतदान केंद्रातील अधिकारी अडचणीत येऊ शकतात.
3/ 7
दरम्यान, तामिळनाडूचे निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार हे स्पष्ट केलं आहे की, मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाही लावायची. पण त्यांच्याकडून ही चूक झाली.
4/ 7
साहू पुढे म्हणाले की, आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार, मतदार करणाऱ्याच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर शाही लावायला प्राधान्य द्यायचं. तसं करणं शक्य नसेल तर त्या नंतरच्या किंवा त्याहीनंतरच्या बोटावर शाही लावण्यात यावी.
5/ 7
पहिलं प्राधान्य हे उजव्या हातालाच दिलं गेलं पाहिजे. जर उजव्या हातावर शाही लावणं शक्य नसेल तरच डाव्या हातावर शाही लावण्यात येऊ शकते.
6/ 7
रजनीकांत यांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ते दरबार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात ते दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत.
7/ 7
‘दरबार’मध्ये रजनीकांत पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता असे दोन व्यक्तीरेखा साकारणार आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला.