राजभर यांनी भाजपसोबत विधानसभा निवडणुक लढवली. भाजपनं त्यांना राज्यमंत्री केले. मात्र त्यांनंतर त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले नाही. दरम्यान राजभर यांनी दिलेले राज्यमंत्रई पदाचा राजीनामाही भाजपनं स्विकारला नाही. त्यामुळं त्यांना कोणत्याही पक्षांना तिकीट दिले नाही. त्यामुळं राजभर यांच्याकडे भाजपच्या कलाने घ्यावे लागले. याचा फायदा भाजपला उत्तर प्रदेशमध्ये झाला. अमित शाहा यांची ही खेळी यशस्वी झाली.
अमित शाह यांच्या निवडणूक लढण्याची रणनीती विरोधकांनाही ठाऊक आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे स्पष्ट दिसून आले. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात याचा प्रत्यय आला. भाजप महागठबंधनपासून वाचण्यासाठी त्यांनी वेगळी रणनीती आखली, त्यांनी उमेदवारांवर प्रचार बंदी आणि भाषणांवर बंदी घातली. त्यानंतर बीएसपी आणि कॉंग्रेस मुस्लिम मतदार एकमेकांसोर आल्यानंतर हाच मुद्दा त्यांनी आपल्या प्रचारात वापरला.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशला आपले टार्गेट केले. आणि लोकसभेत भोपाळमधून हिंदूत्वच्या मुद्यावर त्यांनी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तिकीट दिलं. यावरुनही अनेक वाद झाले. त्यामुळं मोदी यांच्या भाषणाचा फायदा झाला असला तरी, अमित शाहा यांच्या निर्णयांचा भाजपला जास्त फायदा झाला आहे.