वाराणसीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या रॅलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. रॅली सुरू असताना भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एकीकडून 'चौकीदार चोर है'च्या घोषणा दिल्या जात होत्या, तर भाजपचे कार्यकर्ते मोदी, मोदीच्या घोषणा देत होते. या गोंधळात एक कार्यकर्ता जखमी झाला.