

लग्नाच्या वयात अनेक मुलं मुलीची निवड करताना वर्किंग मुलींना पसंत करतात. काही वर्षांपूर्वी मुलांचं प्राधान्य लग्नासाठी सुंदर, सुशील आणि घरकाम करणाऱ्या मुली असायच्या.


आता काळानुसार मुलांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. आता त्यांना घर सांभाळून नोकरी करणारी मुलगी लग्नासाठी हवी असते. या मागची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत.


समजूतदारपणा असतो- मुलांच्या मते, नोकरी करणाऱ्या मुलींना मुलांच्या समस्या जास्त चांगल्याप्रकारे समजू शकतात. अनेकदा ओव्हर टायमिंगमुळे ऑफिसमध्ये उशीर झाला किंवा वरिष्ठांच्या कोणत्या गोष्टीवरून मूड खराब झाला तर वर्किंग पार्टनर जास्त चांगल्याप्रकारे समजू शकते.


आर्थिक स्वरुपात आत्मनिर्भर असते- वाढत्या महागाईमुळे प्रत्येकजणच त्रासलेलं आहे. त्यामुळे लग्नावेळी मुलं अशा मुलीला प्राधान्य देतात जी नोकरी करत असेल. कारण लोकांच्या गरजा वाढत गेल्यावर त्यासाठी पैशांची गरजही असतेच. त्यामुळे दोघंही कमवते असतील तर संसार सुरळीत चालवता येऊ शकतो.