

गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उचार घेत आहेत. ऋषी लवकरच भारतात परततील अशी कल्पना पत्नी नीतू कपूर यांनी दिली होती.


दरम्यान, करिश्मा कपूर आणि रणधीर कपूर ऋषींना भेटायला अमेरिकेत गेले. तिथे संपूर्ण कुटुंबाने एकत्र फोटोही काढला.


हा फोटो रुग्णालयातलाच वाटतो. ऋषी ज्यावर बसले आहेत तो रुग्णालयातील आहे. फोटोच्या मागे ऑक्सिजन सिलेंडर दिसत आहे.


नीतू यांनी ऋषी यांच्यासोबतच्या या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ‘सर्वोत्तम भाऊ.. त्यांच्यात फक्त खाण्याबद्दलच चर्चा होतात.’


नीतू यांनी जो फोटो शेअर केला त्याच ऋषी यांच्यासोबत पत्नी नीतू, मोठा भाऊ रणधीर आणि भाची करिश्मा कपूर त्यांच्यासोबत आहे. फोटोत ऋषी यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आहे. तसेच आधीपेक्षा त्यांचे केसही विरळ झाले आहेत.


रुग्णालयातील आतला हा ऋषींचा पहिला फोटो आहे. याआधी ऋषींचे न्यूयॉर्कमधील अनेक फोटो समोर आले आहेत. मात्र ते सर्व फोटो रुग्णालयाच्या बाहेरचे होते.


करिश्मा आणि रणधीर यांच्याशिवाय शाहरुख खान- गौरी खान, आमिर खान, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्रे, अनुपम खेर यांनी ऋषी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली.