अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर आपल्या मॅरेड लाईफमध्ये आनंदी आहेत. (Bipasha Basu/ Instagram)
2/ 9
दोघंही अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. (Bipasha Basu/ Instagram)
3/ 9
अलिकडेच त्यांनी मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर काढलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Bipasha Basu/ Instagram)
4/ 9
मात्र हे फोटो पाहून बिपाशा गरोदर आहे की काय? असे प्रश्न त्याला काही नेटकरी विचारु लागले. (Bipasha Basu/ Instagram)
5/ 9
अर्थात करणनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु त्यांनंतर त्यांच्या प्रत्येक फोटोवर बिपाशाच्या गरोदरपणाबद्दल प्रश्न येऊ लागले. (Bipasha Basu/ Instagram)
6/ 9
अखेर संतापलेल्या करणनं ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Bipasha Basu/ Instagram)
7/ 9
त्यानं सिद्धार्थ कननला दिलेल्या एका रेडिओ वाहिनीवरील मुलाखतीत बिपाशा गरोदर नाही असा खुलासा केला. (Bipasha Basu/ Instagram)
8/ 9
“ट्रोलर्सला शक्य झालं तर ते मी देखील गरोदर आहे अशी बोंब ठोकतील. माझ्याही चेहऱ्यावर त्यांना 'प्रेग्नेंसी ग्लो' दिसेल.” असं उपरोधिक उत्तर त्यानं दिलं. (Bipasha Basu/ Instagram)
9/ 9
“आम्ही अद्याप पालक होण्याचा निर्णय घेतलेला नाही. या बद्दल आम्ही विचारही केलेला नाही, सध्या आम्ही आमच्या आयुष्याची मजा घेतोय.” असंही तो या मुलाखतीत म्हणाला. (Bipasha Basu/ Instagram)