

बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर त्याच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. नुकतंच त्याला एअरपोर्टवर स्टायलिश बॅगसोबत पाहण्यात आलं.


लोकांना त्या बॅगमध्ये विशेष काही वाटलं नाही. पण जेव्हा त्यांना या बॅगची किंमत कळली तेव्हा अनेकांना काय बोलावं हेच कळलं नाही.


साधारणपणे या बॅगकडे पाहून तुम्हाला ही बॅग कितीची असेल असा वाटतं? ५० हजार... एक लाख.. दोन लाख... जर तुमचं उत्तर हे असेल तर तुम्ही चुकताय. त्याच्या या बॅगेच्या किंमतीत तुमची नवी कोरी कार येऊ शकते.


करण जोहरच्या या बॅगेची किंमत आहे १० हजार ४९५ डॉलर. भारतीय रुपयांमध्ये या बॅगेची किंमत आहे ७ लाख २८ हजार ६९५ रुपये.


ही बॅग The rainbow Louis Vuitton ब्रँडची आहे. हे पहिल्यांदा नाही जेव्हा करण महागड्या गोष्टींमुळे चर्चेत आला. याआधीही सर्वात महागड्या ब्रँडचे कपडे आणि बॅगमुळे तो अनेकदा चर्चेत आला आहे.


महागड्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करण्यात करण जोहरची टक्कर पंजाबचा प्रसिद्ध पॉप स्टार दिलजीत दोसांज आणि बादशहा यांच्यासोबत आहे.