

अभिनेते कबीर बेदी यांचा आज ७२ वा वाढदिवस. कबीर बेदी त्यांच्या सिनेमांपेक्षा अभिनेत्रींसोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत राहिले. कबीर यांनी आतापर्यंत चार लग्न केली.


त्यांची चौथी बायको परवीन दुसांज ही त्यांच्यापेक्षा २९ वर्षांनी लहान आहे. परवीन आणि कबीर फार जवळचे मित्र होते. दोघांनी एकमेकांना सुमारे १० वर्ष डेट केलं. त्यानंतर कबीर यांच्या ७० व्या वाढदिवसाला त्यांनी परवीनशी लग्न केले.


परवीन मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय टीव्ही निर्मातीही आहे. लग्नाआधी परवीन अनेक वर्ष कबीर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये होती. विशेष म्हणजे कबीर यांची मुलगी पूजा बेदी ही परवीनपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.


परवीन आणि कबीर यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. कबीर यांच्यासोबत लग्नासाठी परवीनच्या घरच्यांकडून विरोध होता. मात्र नंतर त्यांनी परवानगी दिली. परवीन आणि कबीर यांनी गुरुद्वाऱ्यात लग्न केलं.


लग्नात दोघांचीही कुटुंब उपस्थित होते. मात्र कबीर यांचं हे लग्न त्यांची मुलगी पूजाला मान्य नव्हतं. त्यामुळे ती या लग्नात गेली नव्हती. पूजाने याबद्दल प्रसारमाध्यमांनाही सांगितलं होतं.


जेव्हा कबीर यांनी परवीनशी लग्न केलं, तेव्हा पूजाने ट्विटवरुन तिची नापसंती दर्शवली होती. पूजाने ट्विवर परवीनला ‘डायन’ही म्हटलं होतं. असं म्हटलं जातं की, पूजाला तिची ही सावत्र आई कधीच आवडली नव्हती.


एवढंच नाही तर परवीनमुळे पूजाने तिच्या वडिलांना घरातून बाहेर काढलं होतं. कबीर यांना आता मुलंही हवी आहेत.


कबीर यांचं पहिलं लग्न डान्सर प्रोतिमा बेदी यांच्याशी झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना पूजा आणि सिद्धार्थ ही दोन मुलं आहेत.


प्रोतिमाशी संबंध खराब झाल्यानंतर त्यांनी ब्रिटीश फॅशन डिझायनर सुसॅन हम्फ्रेसशी दुसरं लग्न केलं. सुसॅनसोबतच लग्नही फार काळ टिकलं नाही.