

जॉन अब्राहमचा आगामी रोमिया अकबर वॉल्टर (रॉ) या शुक्रवारी म्हणजे ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. परमाणु आणि सत्यमेव जयते हे जॉनचे याआधीचे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. यामुळेच आता रॉ सिनेमाकडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा आहेत.


या सिनेमात जॉनने अण्डरकव्हर एजंटची भूमिका साकारली आहे. या सिनेमात तो आठ वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला असून सिनेव्यापार विश्लेषकांच्या मते, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. या पाच कारणांमुळे जॉनचा रॉ हा सिनेमा सुपरहिट ठरू शकतो.


सिनेमाची कथा- जॉनचा परमाणु हा पॉलिटिकल सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. या सिनेमातून जॉनने पॉलिटीकल जॉनरमध्ये स्वतः फिट केले होते. परमाणुप्रमाणे रॉ सिनेमाही सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमासाठी जॉनने स्वतःच्या फिजिक्समध्ये अनेक बदल केले होते.


देशभक्ती- सिनेमाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होतं की हा सिनेमा राष्ट्रभक्तीवर भाष्य करतो. सिनेमाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केलं की हा सिनेमा भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढवण्यासाठी नाहीये. हा सिनेमा पुलवामा आणि उरी हमल्याच्याआधीच प्लॅन केला गेला होता.


अभिनय- या सिनेमात जॉनच्या अभिनयाचा कस लागेल यात काही शंका नाही. या सिनेमासाठी त्याने वजन कमी केलं असून सिक्रेट एजंटचा कसून अभ्यासही केला आहे. यात जॉन आठ वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. या सगळ्यात जॉन नेहमीच म्हणाला की, त्याला ओव्हर अक्टिंग करायला आवडत नाही. आधी असा अभिनय लोकांना आवडायचा पण आता प्रेक्षक सुज्ञ झाले असून Subtle त्यांनाही अभिनय जास्त भावतो.


थ्रिलर- रॉ सिनेमा हा आलिया भट्टच्या राजी सिनेमाचा मेल व्हर्जन असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण दोन्ही सिनेमे हे वेगळ्या धाटणीचे आहेत. रॉ सिनेमाचा ट्रेलर पाहून हा उत्कृष्ट थ्रिलर सिनेमा असू शकतो.


तिकीट खिडकीवर कोणतीच स्पर्धा नाही- रॉसोबत विवेक ओबेरॉयचा पीएम मोदी सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र ५ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण आठवड्यात रॉ सिनेमाला कोणत्याच दुसऱ्या सिनेमाची स्पर्धा नाहीये. त्यामुळ तिकीटबारीवर हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो. विशेष म्हणजे जवळपास १२ दिवसांनी करण जोहरचा मल्टिस्टारर कलंक सिनेमा प्रदर्शित होणार आहे.