तोच रंग, तीच स्टाईल आणि नवा अंदाज, लिमिटेड JAWA जिंकण्याची 'ही' आहे संधी!
90 च्या दशकात तरुणांना भुरळ घालणाऱ्या जावा मोटारसायकल इंडिया आपला 90 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 90 व्या वर्धापन दिनानिमित्ताने jawa motorcycle india ने ‘90th Anniversary Edition’ बाईक लाँच केली आहे.


90 च्या दशकात तरुणांना भुरळ घालणाऱ्या जावा मोटारसायकल इंडिया आपला 90 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 90 व्या वर्धापन दिनानिमित्ताने जावा मोटरसायकल इंडिया (jawa motorcycle india) ने ‘90th Anniversary Edition’ बाईक लाँच केली आहे.


अशी आहे नवी लिमिटेड जावा - नवी लिमिटेड एडिशन जावा ही (Jawa Classic 300) या मॉडलवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 293cc का लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. यामध्ये 27bhp ची पॉवर आणि 28Nm चा टॉर्क जनरेट होईल. सोबतच सहा स्पीड गिअर बॉक्सही मिळेल.


या बाईकच्या नॉन एबीएस व्हर्जनची भारतामध्ये एक्स-शोरूम किंमत 1.64 लाख रुपये असणार आहे. तर एबीएस व्हर्जनची किंमत 1.72 लाख रुपये असणार आहे. ही बाईक 1929 मध्ये जेव्हा जावा सुरू झाली होती, त्या काळातील आठवण म्हणून लाँच केली आहे. विशेष म्हणजे, फक्त 90 स्पेशल बाईक विक्रीस उपलब्ध आहे.


लगेच मिळणार डिलेव्हरी -ही बाईक Jawa 500 OHV च्या रंगरुपात मिळणार आहे. सोबतच या बाइकच्या इंधन टाकीवर 90th Anniversary commemorative असं लिहून एक विशेष नंबरही मिळणार आहे. जर तुम्ही ही गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कारण, जावा या बाईकची सुपरफास्ट डिलेव्हरी देणार आहे. जावाच्या डिलरशिप्सकडून या लिमिटेड एडिशन बाइकची 15 ऑक्टोबर 2019 पासून विक्री सुरू होणार आहे.


लकी ड्रामध्ये मिळेल नवी कोरी जावा- तुम्ही जावा बाइकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी जावाने लकी ड्राही आयोजित केला आहे. यामध्ये तुम्हा नवी कोरी जावा जिंकण्याची संधी आहे. तसंच Jawa motorcycle जर बूक केली असेल किंवा 22 ऑक्टोबरच्या आधी बूक करत असाल तर तुम्ही या लकी ड्रासाठी पात्र ठरणार आहात.


ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं...असं या बाईकबद्दल म्हणावे लागेल कारण १९ च्या दशकात ज्या दोन सायलेंसरवाल्या बाईकने तरुणाचा रुबाव वाढवला त्या बाईकने जोरदार कमबॅक केले आहे. त्या दुचाकीचे नाव आहे जावा...


क्लासिक लेजन्ड्स प्रा. लि.ने आज नव्या दमाच्या आणि त्याच स्टाईलच्या तीन गाड्या लाँच केल्या आहे. Jawa (स्टँडर्ड), Jawa 42 आणि Jawa Perak असे या बाईकीची नावं आहे.


नवीकोरी 293 सीसी, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचसी इंजिन डबल क्रेडल चेसीसयुक्त पुन्हा एकदा क्लासिक रुपात दाखल झाली आहे.


कंपनीने फॅक्टरी कस्टम जावा पेराकचेही अनावरण केले, यामध्ये 334सीसी क्षमतेचे, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचएस इंजिन आहे जे 30बीएचपी आणि 31एनएम टॉर्क क्षमता निर्मिती करते. पेराकची किंमत रु. 1,89,000 असून याची नोंदणी कालांतराने खुली करण्यात येईल.


वैशिष्ट्यपूर्ण रचना, अद्वितीय आवाज, शैली आणि चालविण्याचा अनुभव या सर्वच बाबी लक्षात घेऊन दोन्ही जावा मॉडेल्सची निर्मिती करण्यात आल्या आहेत.


आजच्या रायडर्ससाठी नवी जावा आणि जावा फॉर्टी टू अनुक्रमे रेट्रो आणि मॉडर्न क्लासिक्स पद्धतीने ट्यून केल्या आहेत.


नवीन जावा इंजिन: 293सीसी लिक्विड कूल्ड, एक सिलिंडर, डीओएचसी इंजिन 293सीसी लिक्विड कूल्ड, एक सिलिंडर, डीओएचसी इंजिनासह इटालियन इंजिनीअरिंगच्या सहाय्याने निर्मिती करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, या दोन्ही गाड्या बीएस 6 मानाकांसाठी तयार असणारा इंजिन प्लॅटफॉर्म यात दिला गेला आहे.


जावाचा आवाज ही या गाडीची आणखी एक खास ओळख होती. त्यामुळे तसाच आवाज तुम्हाला या जावामध्ये ऐकू येणार आहे.