

पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020 Final) गाठणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. गुरुवार झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 1 MI vs DC) सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचे गोलंदाज खरे हिरो ठरले.


दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या दोन ओव्हरमध्येच एकही धाव न देता ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.


बोल्टनं पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले. दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉला शून्यावर बाद केले. त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बोल्टनं अजिंक्य रहाणेला शून्यावर बाद केले. या सामन्यात बोल्ट जणू आपल्या अपमानाचा बदला घेत असल्याचे दिसत होते.


खरंतर 2018, 2019मध्ये ट्रेंट बोल्ट दिल्लीकडून खेळत होता. मात्र 2019मध्ये दिल्लीनं बोल्टला रिलीज केले. दिल्लीनं बोल्टच्या बदली दिल्लीनं अंकित राजपूत या युवा गोलंदाजाला विकत घेतले होते.


2019च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघानं बोल्टला विकत घेतले, आणि त्यांचा निर्णय योग्य ठरला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टनं या हंगामात 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत.