Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सलग चार सामने जिंकत पंजाबचा संघ प्ले ऑफ गाठण्याच्या तयारीत आहेत. मात्र असे असले तरी एक स्टार खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे. ग्लेन मॅक्सवेल या स्टार खेळाडूनं 11 सामन्यात केवळ 102 धावा केल्या आहेत.
2/ 6


किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं आयपीएल लिलावात मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाखांना विकत घेतले आहे. मात्र मॅक्सवेलला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे.
4/ 6


या हंगामात ग्लेन मॅक्सवेलची सर्वोत्तम खेळी 32 आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅक्सवेलनं 32 धावा केल्या होत्या.
5/ 6


या हंगामात मॅक्सवेलनं दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात 1, RCB विरुद्ध 5, राजस्थान विरुद्ध नाबाद 13, मुंबई इंडियन्सविरुद्ध 11 धावा केल्या होत्या.