Home » photogallery » news » IPL 2020 KKR MYSTERY SPINNER VARUN CHAKRAVARTHY SELECTED FOR INDIA VS AUSTRALIA T20 SERIES MHPG
फक्त 12 टी-20 सामने खेळलेल्या KKRच्या 'या' मिस्ट्री गोलंदाजाला मिळाली टीम इंडियात जागा!
1 प्रथम श्रेणी आणि 11 IPL सामने खेळणाऱ्या या गोलंदाजासाठी उघडले भारतीय संघाचे दरवाजे.
|
1/ 6
आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. बीसीसीआयनं याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. दरम्यान, यावेळी आयपीएल खेळणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात जागा देण्यात आली आहे.
2/ 6
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा वरूण चक्रवर्तीची भारतीय संघात निवड झाली आहे. हैदराबादविरुद्ध वरूणनं 5 विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे वरूणसाठी आता थेट भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत.
3/ 6
आयपीएलमध्ये वरूणला मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखले जाते. टीम इंडियात निवड होणं वरूणसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही आहे.
4/ 6
29 वर्षीय खेळाडूनं 2018मध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. वरूणनं आतापर्यंत केवळ 12 टी-20 सामने खेळले आहेत. यात केवळ 1 प्रथम श्रेणी सामना आहे. त्यामुळे भारतीय संघात निवड़ झालेल्या या युवा खेळाडूंकडे खूप अपेक्षा आहे.
5/ 6
दरम्यान, वरूणनं भारतीय संघात निवड झाल्यानंतर, हे एका स्वप्नासारखं आहे. माझं लक्ष्य संघासाठी सातत्यानं खेळत राहणं, चांगली कामगिरी करणं आहे. अपेक्षा आहे की भारतीय संघासाठी सुद्धा मी अशीच कामगिरी करेन.
6/ 6
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौऱ्यात भारत चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत.या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होईल. दरम्यान यंदा टी-20 सामन्यांसाठी कार्तिक त्यागी, कमलेश नागरकोटी या युवा गोलंदाजांना राखीव म्हणून घेण्यात आले आहे.