

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील अंतिम सामना रविवारी होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हैदराबादमध्ये हा सामना रंगणार आहे.


आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 326 षटकार मारले आहेत. फक्त 125 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.


आय़पीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. त्याने 189 सामन्यातील 169 डावांत 209 षटकार मारले आहेत.


धोनीनंतर सुरेश रैनाचा क्रमांक लागतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रैनाने आतापर्यंत 194 षटकार मारले आहेत.


फायनलला पोहचलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने 193 षटकार खेचले आहेत.