

सैफ अली खान यांचा नवाबांच्या घराण्याशी संबंध आहे. सैफ अली खान यांना छोटे नवाब म्हटलं जातं. नवाबांच्या घराण्याचे असल्याने त्यांच्या नवाबी ढंगाच्या पतौडी पॅलेसबाबत अनेकांना आकर्षण आहे. नावानुसार पतौडी पॅलेज खूप आलीशान आहे. याच्या प्रत्येक कोपऱ्यात नवाबी अंदाज पाहायला मिळतो. हा पॅलेज पुन्हा खरेदी करण्यासाठी सैफ अली खान याला खूप त्रास सहन करावा लागला.


हरियाणातील गुरुग्रामस्थित पतौडी पॅलेज हे सैफचं वडिलोपार्जित घर आहे. सर्व सुविधायुक्त आलीशान पॅलेसची किंमत 800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. येथे आधुनिक सुख-सुविधेशी संबंधित सर्व गोष्टी आहेत. पॅलेजमध्ये मोठे हॉल आणि हिरवंगार गार्डनही आहे. इतक्या वर्षांनंतरही पॅलेसचं सौंदर्य अबाधित आहे.


1900 च्या सुरुवातील पतौडी पॅलेस बांधण्यात आलं. हे इब्राहिम कोठी या नावानेही ओळखलं जातं. नुकतेच सैफने याचं लीज पूर्ण करीत पजेशन पुन्हा घेतलं आहे. सैफने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, पतौडी पॅलेज माझ्या वडिलांनी फ्रांन्सिस आणि अमन यांना कर्जाऊ दिलं होतं. जे पॅलेजमधील हॉटेल चालवित होते. ते प्रॉपर्टीची काळजी घेत होते. ते आमच्या कुटुंबापैकी एक होते. यापैकी फ्रांन्सिस यांचा निधन झालं आहे.


सैफने मुलाखतीत सांगितलं की, ही प्रॉपर्टी नीमराणा हॉटेल्सकडे कर्जाऊ होती. वडिलांच्या मृत्यूनंतर हे पॅलेज पुन्हा घेण्याची इच्छा निर्माण झाली. जसं शक्य झालं तर पॅलेसची लीज भरुन मी पॅलेसचं पजेशन पुन्हा घेतलं.


एका मुलाखतीत सैफने सांगितलं होतं की, तसं पाहता हे पॅलेस त्यांना वडिलोपार्जित संपत्तीचा भाग म्हणून मिळायला हवं होतं, मात्र त्यांना याची किंमत द्यावी लागली. सैफने सांगितलं की, चित्रपटातून कमावलेल्या पैशातून हा पॅलेज पुन्हा खरेदी केला.


सैफ आपल्या कुटुंबासोबत येथे नेहमी येत असतो. नुकताच त्याने लग्नाचा वाढदिवसही या पॅलेसमध्ये साजरा केला.


एका मॅगजीननुसार पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. ज्यात 7 ड्रेसिंग रूम, सात बेडरुम, सात बिलियर्ड खोल्या आणि मोठी डायनिंग खोली आहे. सैफच्या आजोबांनी इफ्तियार अली खान याच्याकडून पॅलेस बांधून घेतला होता. याची डिझाइन रॉबर्ड टोर रसेल यांनी केलं होतं.


पॅलेस इतका आलिशान आहे की, या मोठ मोठ बंगलेही देखील या पॅलेससमोर शुल्लक वाटतात. तैमूरचा वाढदिवस या पॅलेसमध्ये साजरा करण्यात आला. ज्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. सैफ अली खान, शर्मिला टागोर, करीना कपूर खान, सोहा अली खान, कुणाल खेमू यांच्या सह कपूर कुटुंबाचे सदस्यही यात सहभागी झाले होते.