मेगास्ट्रिप किंवा इएमव्ही डेबिट, क्रेडिट कार्डबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण बॅटरीवर चालणार क्रेडीट कार्ड देखील येणार आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? विश्वास बसत नाही? पण हे सत्य आहे.
आता इंडसइंड बँकेचं बॅटरीवर चालणारा क्रेडीट कार्ड बाजारात आणणार आहे. या कार्डला बटन असणार आहे. ज्या बटनाद्वारे तुम्ही खरेदी करू शकता.
2/ 5
कार्डद्वारे शॉपिंग करताना तुम्हाला पेमेंटचे तीन पर्याय येतील. त्यामध्ये क्रेडीट, ट्रान्स्झिक्शन, ईएमआय आणि रिवॉर्ड पॉईंट असा चौथा पर्याय असेल. शॉपिंग करताना तुम्हाला आता कार्ड स्वाईप करायची गरज लागणार नाही.
3/ 5
बॅटरीवर चालणारं हे पहिलंच कार्ड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खरेदीनंतर तुम्हाला इएमआयचा पर्याय हवा असल्यास तुम्हाला कस्टमर केअरला फोन करायची गरज नाही. तुम्ही ते कार्डच्या माध्यमातूनच करू शकता. शिवाय रिवॉर्ड पॉईंट देखील वापरू शकता.
4/ 5
कार्ड वापरताना तुम्ही वरील उपलब्ध पर्यांयापैकी जो पर्याय वापरू इच्छिता त्यावर प्रेस करा. त्यानंतर त्या पर्यायापुढे लाईट येईल. तुम्ही जर एएमआय या पर्यायावर प्रेस केलं तर तुम्हाला इएमआयचे 3, 6, 12 आणि 24 असे पर्याय दिसतील.
5/ 5
इंडसइंड बँकेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला याबाबतची अधिक माहिती मिळेल. बँकेनं डायनामिक्स इंकच्या साथीनं या कार्डची निर्मिती केली आहे. ज्याचं मुख्यालय अमेरिकेतील पिटरबर्ग येथे आहे. डायनामिक्स इंक कंपनी या कार्डची डिजाईन आणि कार्ड तयार देखील करते.