भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला टीममध्ये (India vs England) तीन वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे, त्याआधी भारतीय टीमच्या खेळाडूंनी इंग्लंडची सफारी केली. यामध्ये स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, प्रिया पूनिया, हरलीन देओल यांचा समावेश होता. इंग्लंडमध्ये फिरतानाचे या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वनडे सीरिजआधी भारतीय महिला टीमने इंग्लंडविरुद्धची टेस्ट मॅच ड्रॉ केली, यानंतर खेळाडूंनी आठवडाभर आराम केला.