भारतीय रेल्वेनं घडवला इतिहास, सर्वात शक्तीशाली स्वदेशी इंजिनची यशस्वी चाचणी
भारतीय रेल्वेनं मेक इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. या इंजिनसाठी 19 हजार कोटींचा खर्च झाला.
|
1/ 5
मधेपुरा इथं तयार झालेल्या रेल्वे इंजिनची चाचणी पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शनमध्ये झाली. इंजिनसह 118 मालगाडी डबे जोडून ट्रायल घेण्यात आली. जंक्शनमधून झारखंडमधल्या बरवाडीह इथंपर्यंतचं 276 किमी अंतर पार पाडलं.
2/ 5
12 हजार हॉर्स पॉवरचं इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या मालगडीच्या डब्यांसह ही पहिलीच चाचणी होती. चाचणीनंतर भारतीय रेल्वेनं सांगितलं की हा अभिमानाचा क्षण होता. रेल्वेच्या माहितीनुसार इंजिन 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
3/ 5
जगात सर्वाधिक हॉर्स पॉवरचं इंजिन तयार करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे.
4/ 5
इंजिन तयार करण्यासाठी 19 हजार कोटींचा खर्च करण्यात आला. सुरुवातील 5 इंजिन फ्रान्समधून आणून अॅसेंबल करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्ये याचे प्रोडक्शन सुरू झाले. याआधी 2019 मध्ये पहिल्या रेल्वे इंजिनची चाचणी झाली आहे.
5/ 5
मेक इन इंडिया अंतर्गत हा प्रोजेक्ट करण्यात आला. भारतात अशी इंजिन निर्मिती झाल्यानं मालगाड्यांचा वेग वाढणार आहे. यामुळे इतर गाड्यांच्या वाहतुकीसाठी कमी अडथळा येईल.