Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
या भारतीय कंपनीला मिळालं खनिज तेलाचं मोठं भंडार, देशातील मोठी मागणी होईल पूर्ण
भारतीय कंपनी ओएनजीसी (ONGC) विदेश लिमिटेडला मध्य अमेरिकन देश कोलंबियामधील लानोस बेसिस प्रकल्पामध्ये खनिज तेलाचं मोठं भांडार सापडलं आहे. देशातील खनिज तेलाच्या मागणीचा एक मोठा हिस्सा यामुळे भागवला जाऊ शकतो. या प्रकल्पामध्ये ONGC विदेशची 70 टक्के भागीदारी आहे.
1/ 4


या प्रकल्पातील उर्वरित 30 टक्के हिस्सा जिओपार्क लिमिटेडकडे आहे. जी लॅटिन अमेरिकेत तेल आणि वायूचा व्यवसाय करते. इंडिगो -2 मध्ये चाचणी करताना दररोज 6,300 बॅरल तेल प्राप्त होते आहे.
2/ 4


ओएनजीसी विदेश लिमिटेडच्या मते, सध्या या खनिज तेलाच्या विहिरीचे मुल्यांकन केले जात आहे. त्याच वेळी ओव्हीएलला या ब्लॉकमध्ये चौथ्या ठिकाणी तेलाचा स्त्रोत सापडला आहे, ज्याचा व्यावसायिक उपयोग केला जाऊ शकतो.
3/ 4


कोलंबियामधील शोधकार्यात ओनएनजीसी विदेशचा सात तेल/गॅस ब्लॉक्समध्ये वाटा आहे. या व्यतिरिक्त मानसरोवर एनर्जी कोलंबिया लिमिटेड या संयुक्त कंपनीत त्याची समान भागीदारी आहे.