जवान लक्ष्मण जोधपुरमधील बिलाडा भागातील खेजडला गावातील राहणारे होते. जम्मू-कश्मीरनध्ये पाकिस्तानकडून राजौरी सेक्टरमध्ये केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात झालेल्या गोळीबारीत लक्ष्मण जखमी झाले होते. त्यांना सैन्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र त्यांना वाचवता आलं नाही.
संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, पाक सैन्याने राजोरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या गोळीबारात 21 वर्षीय लक्ष्मण गंभीर स्वरुपात जखमी झाला होता. या वर्षी नियंत्रण रेषेवर पाकद्वारा शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याच्या घटनेत लक्ष्मण शहीद होणारे चौथे जवान आहेत.