IND vs AUS : वनडे सीरिजमध्ये विराटच्या निशाण्यावर सचिन-पॉण्टिंगची मोठी रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट (Virat Kohli) च्या निशाण्यावर अनेक रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) यांची रेकॉर्ड तोडू शकतो.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा नवी रेकॉर्ड त्याच्या नावावर होतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही विराटच्या निशाण्यावर अनेक रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉण्टिंग यांची रेकॉर्ड तोडू शकतो. (Photo- Virat Kohli Instagram)


विराट कोहलीला वनडे सीरिजमध्ये एक शतक मारता आलं तर तो पॉण्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सचिननंतर रिकी पॉण्टिंगच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं आहेत. (Photo- Virat Kohli Instagram)


वनडे सीरिजमध्ये एक शतक करताच विराट कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणारा खेळाडू होईल. विराटच्या नावावर कर्णधार असताना 41 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. एक शतक त्याला वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या रिकी पॉण्टिंगच्या बरोबरीत नेवून ठेवेल. पॉण्टिंगच्या नावावर कर्णधार म्हणून वनडेमध्ये 22 शतकं आहेत. (Photo- Virat Kohli Instagram)


वनडे क्रिकेटमध्ये सचिनची दोन रेकॉर्डही विराट मोडू शकतो. विराटने एक शतक केलं, तर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतकं होतील आणि तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करेल. विराट वनडे क्रिकेटमध्ये 12 हजार रन करण्यापासून 133 रन लांब आहे. या सीरिजमध्ये त्याने 133 रन केल्या तर सगळ्यात जलद 12 हजार रन करण्याचा विक्रम विराटच्या नावावर होईल. (Photo- Virat Kohli Instagram)