होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतानं सोमवारी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं आहे, तर उप कर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडं आहे. तर, सगळ्यात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मेहंद्रसिंग धोनी आपला चौथा वर्ल्ड कप खेळतील. या संघात पाच फलंदाज, दोन यष्टिरक्षक, तीन फिरकी गोलंदाज, दोन ऑलराऊंडर आणि तीन जलद गोलंदाज यांचा समावेश केला आहे. या 15 खेळाडूंकडे एकूण 1573 सामन्यांचा अनुभव आहे.
2/ 4


या 15 खेळाडूंनी 1573 एकदिवसीय सामन्यात 1213वेळा फलंदाजी केली आहे. यात 44.60च्या सरासरीनं 41 हजार 700 धावा केल्या आहेत. तर, या खेळाडूंच्या नावावर एकूण 92 शतक, 219 अर्धशतक ठोकले आहेत. उप-कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 264 सर्वोच्च धावा केल्या आहेत.