कोरोनाची वर्षपूर्ती! पहिला Coronavirus सापडला तो वुहानचा बाजार आता कसा फुललाय पाहा PHOTO
चीनमध्ये (China) पहिली Coronavirus ची केस सापडली त्याला वर्ष झालं. ज्या वुहानच्या बाजारातून (Wuhan Market) विषाणू पसरला आणि जगाला लॉकडाऊनमध्ये जावं लागलं, तो बाजार आता असा गजबजला आहे.


चीनमधील (china) वुहानमध्ये (wuhan) कोरोनाचा (covid19) पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. Coronavirus मुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेलं, पण चीनमधील मार्केट सुरळीत असल्याचं फोटोंमध्ये दिसून येत आहे. Photo: Reuters


चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर लोक रस्त्यावरील बाजारपेठेत खरेदी करताना दिसत आहेत. (Photo: Reuters)


चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर रस्त्यावरील बाजारपेठेत कपडे खरेदी करायला झुंबड उडालेली दिसत आहे. (Photo: Reuters)


कोरोनाच्या संकटामुळे अजूनही जगभरात अनेक ठिकाणी एकत्र येण्यावर बंधनं आहेत. पण चीनच्या वुहानमध्ये आता सर्व काही सुरळीत झालेलं दिसतं. Photo: Reuters


कोरोनाची लस दृष्टिक्षेपात आल्यानंतर आता साथ संपुष्टात येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. इथे चीनमध्ये फेस मास्क (face mask) घालून खरेदी करायला झुंबड उडाली आहे. Photo: Reuters


वुहानमध्ये फक्त बाजारातच नाही तर सार्वजनिक ठिकाणी असाच उत्साह दिसतो. एका उद्यानात गाण्यांवर नाचतानाचा हा फोटो 7 डिसेंबर 2020 ला टिपला आहे. REUTERS/Aly Song - RC2UIK9AAN7I