

अंटार्टिकामध्ये राहण्यासाठी इग्लू (Igloo) ही बर्फाची घरं असतात, हे आपण शाळेच्या पुस्तकात वाचलं असेल, पण पर्यटनासाठी देखील या बर्फाच्या घराचा वापर होताना दिसून येतो. भारतात मनालीमध्ये(Manali) अशा इग्लूत राहायचा अनुभव मिळू शकतो.


हिमाचल प्रदेशातील(Himachal pradesh) मनालीमधील (Manali) दोन युवक मागील पाच वर्षांपासून इग्लू (Igloo) तयार करत आहेत. मनालीपासून 13 किलोमीटर दूर असणाऱ्या सीथन गावात हे इग्लू (Igloo) तयार करण्यात आले असून दूरदूरवरून पर्यटक या ठिकाणी हिवाळी पर्यटनासाठी येत आहेत.


विकास नावाचा तरुण त्याच्या मित्राबरोबर मिळून हे इग्लू (Igloo) तयार करतो. News18 शी बोलताना विकासने सांगितलं की, एक इग्लू तयार करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. उत्तम प्रतीचा बर्फ असल्यास इग्लू अतिशय चांगले तयार होतात.


मागील काही वर्षांपासून सीथन या गावाची इग्लूचे (Igloo) गाव म्हणून ओळख झाली आहे. याविषयी बोलताना आशिषने सांगितलं की, पर्यटक यासाठी लांबूनही येत आहेत.