

सकाळी सकाळी पोटाला आधार म्हणून नाश्ता करतात. अशावेळी शिळे पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. सकाळी कधी कधी वेळ मिळत नाही. त्यामुळे नाश्ता करता येत नाही.


नाश्त्याला असलेल्या पदार्थापैकी काही आवडतात तर काही आवडत नाहीत. दररोज आवडणारे पदार्थच मिळतील असे नाही. जर तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल आणि तो एक-दोन दिवस नाही तर तीन वर्षांपर्यंत टिकू शकतो असं तुम्हाला कोणी सांगितलं तर पटणार नाही.


मुंबई विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाने केलेल्या संशोधनातून एक असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे ज्यामुळं इडली, उपमा आणि ढोकळा हे पदार्थ तीन वर्ष खराब होणार नाहीत.


रेडिएशन तंत्रज्ञानाने पॅक केलेली इडली दोन वर्षानंतरही खराब होत नाही. यासाठी इलेक्ट्रॉन बीमच्या तंत्रज्ञानाला विकसीत करण्यात आलं आहे.


गेल्या दहा वर्षापासून यावर संशोधन सुरू होते. भौतिकशास्त्र विभागाने शिजवलेल्या पदार्थांवर संशोधन केलं. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी बीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला.


या संशोधनामुळे अंतराळात जाणाऱ्या अंतराळविरांच्या अन्न पदार्थाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय पदार्थ जास्त काळ टिकल्याने ते परदेशात निर्यात करणं सोपं होईल.